डोंबिवली
। :- जैन मंदिरात पारंपारिक वेश परिधान करून दर्शनाच्या बहाण्याने जाऊन मंदिरातील चांदीच्या दागिने चोरणार्या चोरट्याला डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात . नरेश जैन असे चोरट्याचे नाव असून हा फक्त जैन मंदिरांमध्ये चोऱ्या करत होता .नरेश विरोधात मुंबई मधील विविध पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत . डोंबिवलीतील तीन जैन मंदिरात त्यांनी चोरी केली होती सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात त्याच्याकडून चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आलेत.
:डोंबिवली परिसरातील तीन जैन मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली होती .चोरट्यांनी मंदिरातील चांदीचे दागिने ,चांदीच्या वस्तू चोरी केल्या होत्या . याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . डीसीपी सचिन गुंजाळ एसीपी सुनील कुराडे रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आशालाता खापरे बळवंत भराडे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला .मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे चोरट्याची ओळख पटवून पोलिसांनी नरेश जैन या सराईत चोरट्याला मुंबई परिसरातून बेड्या ठोकल्यात . नरेश हा जैन मंदिर मध्ये चोऱ्या करायचा .नरेश पारंपारिक वेशभूषा करत दर्शनाच्या पाहण्याने जैन मंदिरात जात होता संधी मिळताच जैन मंदिरातील दागिने चोरी करायचा . नरेश विरोधात मुंबईमधील काळाचौकी ,एलटी मार्क, सायन ,आगरी पाडा ,आझाद मैदान , मलबार हिल, घाटकोपर, डी एन नगर ,बोरवली पोलीस ठाण्यांमध्ये एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत . नरेश आणि आतापर्यंत फक्त जैन मंदिरांना लक्ष केले आहे, पुढील तपास एसीपी सुनील कुऱ्हाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे