दारुवाल्यास चुगली केल्याचा वादातून केली मित्राची हत्या
दारूच्या अड्ड्यावरून दोन आरोपींना अटक
डोंबिवली दारुवाल्याला चुगली केल्याचा वादातून दोन मित्रांनी एका मित्राची बांबू ने मारहाण करत हत्या केल्याची घटना डोंबिवली सोनारपडा परिसरात घडली आहे .इतकेच नव्हे तर हत्या केल्यानंतर कुणाला संशय येवू नये म्हणून प्रेत दुसऱ्या माळ्यावरून खाली फेकले .राजेश सहानी असे मयत इसमाचे नाव आहे .या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तपास करत अवघ्या काही तासात दादू मटू जाधव उर्फ पाटील ,विनोद पडवळ या दोघांना अटक केली आहे .धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर हे दोन्ही आरोपी पुन्हा दारू पिण्यासाठी दारूच्या अड्ड्यावर गेले होते .त्याच ठिकाणाहून पोलिसांनी त्यांना अटक केली.
डोंबिवली पूर्व सोनारपाडा परिसरात एका साई श्रद्धा इमारतीच्या आवारात मृतदेह आढळून आल्याची माहिती सकाळच्या सुमारास मानपाडा पोलिसाना मिळाली .पोलिसांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला .मृतदेहावर असलेले जखमा पाहून सदर इसमाची हत्या झाल्याचा संशय पोलिसानी व्यक्त करत तपास सुरू केला .अवघ्या काही तासात या प्रकरणी दादू मटू जाधव उर्फ पाटील ,विनोद पडवळ या दोघांना अटक केली .दादू मटू जाधव उर्फ पाटील ,विनोद पडवळ ,व राजेश सहानी हे तिघे राहतात .तिघांना देखील दारूचे व्यसन आहे .काल रात्रीच्या सुमारास दादू च्या घरी विनोद व राजेश या तिघांनी एकत्र दारू प्यायली.त्यानंतर तिघे दादूच्या घरी आले ..घरी आल्यानंतर दादू व विनोदने राजेश ला दारुवाल्याला चुगली का लावली असा जाब विचारला.या तिघांमध्ये वाद झाला .या वादातून संतापलेल्या दादू आणि विनोदने राजेशला शिवीगाळ करत बांबू लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. कुणाला संशय येऊ नये म्हणून राजेश चा मृतदेह दुसऱ्या माळ्यावरील खिडकीतून खाली फेकून दिला. त्यानंतर दोघेही तेथून पसार झाले होते..मात्र मानपाडा पोलिसांनी तपास सुरू केला ..आजूबाजूला चौकशी केली असता याच इमारतीमध्ये दादूची खोली असल्याची माहिती मिळाली दादूने पहाटे चार वाजता शेजाऱ्यांकडे लाकडी दांडके आहे का याचे विचार न केली होती.. पोलिसांनी तात्काळ या दोन्ही आरोपींचा शोध घेत अवघ्या काही तासात या हत्येचा उलगडा करत दोघांना दारूच्या अड्डयावरूनच बेड्या ठोकल्या .