कपटीने मुघलांनी शिवरायांचे गड ताब्यात घेतले. तसेच मिंधे गट मुघल निती वापरून शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्यासाठी आटापिटा करीत आहे अशी घणाघाती टिका उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते केदार दिघे यांनी डोंबिवलीतील शिवसेना शहर शाखा ताब्यात घेण्यावरुन बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाव केली आहे . तर केदार दिघे यांच्या टिकेचा बाळसाहेबांची शिवसेना युवा नेते दीपेश म्हात्रे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या जनतेच्या शाखा ताब्यात घेऊन भाडे तत्वावर देऊन पैसा कमाविण्याचा कुटील डाव बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी हाणून पाडला आहे असा पलटवार म्हात्रे यांनी केला आहे.
27 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शाखा बाळासाहेबांच्या शिवसेना या पक्षाने ताबा घेतला. या पक्षाचे कार्यकर्ते जतीन पाटील यांच्या नावावर ही शाखा असल्याचा दावा शिंदे गटातील कार्यकत्र्यानी केला. पत्रकार परिषद घेऊन उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, युवा सेना नेते दीपेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले की, सर्व कागदोपत्री व्यवहार पूर्ण करुन ही शाखा आम्ही विकत घेतली आहे. या दरम्यान शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. पोलिसांनी मध्यस्थी करीत वातावरण शांत केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी सांगितले की, आम्ही न्यायालयीन लढा लढणार. आत्ता जे काही सुरु आहे. ते चुकीचे आहे. आत्ता या वादात केदार दिघे यांनी उडी घेतली आहे. केदार दिघे यांनी ट्वीट करीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. या ट्वीटमध्ये दिघे यांनी म्हटले आहे की,कपटीने मुघलांनी शिवरायांचे गड ताब्यात घेतले. तसेच मिंधे गट मुघल निती वापरून शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्यासाठी आटापिटा करीत आहे. दिघे यांच्या या टिकेला म्हात्रे यांनी प्रतिउत्तर देत रिट्वीट केले आहे की, बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या जनतेच्या शाखा ताब्यात घेऊन भाडे तत्वावर देऊन पैसा कमाविण्याचा कुटील डाव बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी हाणून पाडला आहे. शिवसेनाची शाखा ही ख:या शिवसेनेची बाळासाहेबांच्या शिवसेनाची आहे. ही शाखा योग्य ती कादेशीर प्रक्रिया करुन घेण्यात आली.