न्यायालयीन लढाईत काँग्रेस साथ देणार*
मानपाडा
भाजपच्या डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी विनयभंग प्रकरणातील महिलेला दोन दिवसापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी त्याची भेट घेऊन तिचे सांत्वन केले होते मानपाडा पोलीस स्टेशनच्या परिसरात या महिलेने गेल्या 22 दिवसापासून आपले उपोषण सुरूच ठेवले आहे आज
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेश वरुन
नंदू जोशी प्रकरणात तक्रार दार पीड़ित महिला यांची मानपाडा पोलिस स्टेशन, येथे भेट घेउन ,त्यांना सर्व मदत केली जाणार असल्याचे काँग्रेस पक्षाचे विधि विभागाचे प्रदेश अध्यक्ष एडवोकेट रवि राव, कल्याण बार एशोसिएशन एडवोकेट प्रकाश जगताप , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ,नागरी विकास सेल
चे अध्यक्ष एडवोकेट नविन सिंह, प्रदेश काँग्रेस कमीटीचे सचिव संतोष केने ,शिबु शेख , एकनाथ म्हात्रे , संकेत लोके ,राहुल केने व काँग्रेस पक्षाचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.