बेकायदेशीरपणे पिस्तूल खरेदी विक्री करणारे दोन गुन्हेगार गजाआड
दोन पिस्तूल,4 जिवंत काडतुस हस्तगत
सापळा रचत मानपाडा पोलिसांनी केली अटक
Anchor : – एक व्यक्ती गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी डोंबिवली पांडुरंग वाडी परिसरात येणार असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी पांडुरंग वाडी परिसरात सापळा रचत एका तरुणाला गावठी पिस्तूल व दोन जिवंत कडतूसांसह अटक केली.परशुराम करवले असे या तरुणाचे नाव आहे.. परशुराम याने याआधी देखील सातारा येथील अक्षय जाधव या तरुणाला गावठी पिस्तूल विठ्ठलाची माहिती समोर आली. मानपाडा पोलिसांनी सातारा येथून सापळा रचत अक्षय जाधव याला देखील अटक केली.. त्याच्याकडून एक पिस्तूल व ०२ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. दरम्यान परशुराम व अक्षय हे दोन्ही सातारा येथील रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात कराड ,वडुज , सातारा अवैध शस्त्र विक्री व वाळु चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान परशुराम करवले व अक्षय जाधव यांनी याआधी काही पिस्तल खरेदी विक्री केलेत का ? दोघे पिस्तूल कुठून आणत होताते ?याचा तपास पोलीस करत आहेत..
व्हिओ : डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांडुरंगवाडी येथे इसम गावठी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी या इसमाचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले. सहायक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे यांच्या पथकाने पांडुरंग वाडी परिसरात सापळा रचला. पांडुरंग वाडी परिसरातील एका हॉटेल जवळ एक तरुण संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेत त्याची अंगझडती पेतली असता, त्यांचेकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे मीळुन आली. चौकशीत त्याचे नाव परशुराम करवले असून तो सातारा येथील राहणारा असल्याची माहिती समोर आली. अधिक चौकशी दरम्यान त्याने याचप्रकारचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल सातारा येथील अक्षय जाधव याला विक्री केल्याची माहिती समोर आली. मानपाडा पोलिसांच्या पथकाने सातारा येथे धाव घेत अक्षय जाधव याला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेली आहेत.हे दोघे सातारा जिल्हयातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांच्या विरोधात कराड ,वडुज , सातारा पोलीस ठाण्यात अवैध शस्त्र विक्री व वाळु चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदर इसमांनी आणखी कोठे अवैध शस्त्र विक्री केली आहे तसेच त्यानी सदरची अवैध शस्त्रे कुठुन आणली याबाबत पुढील तपास चालु आहे.