Anchor : मुंबई महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या रस्ते कॉंक्रिटीकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी ब्लॉगद्वारे सविस्तर माहिती दिली .मुख्यमंत्र्यांकडून उत्तरं दिली जात नसल्याचीही आदित्य यांनी टीका केली आहे .आदित्य ठाकरेंच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपहासात्मक कविता ट्विट करत प्रत्युत्तर दिलंय.
काय आहे ट्विट…
भ्रष्टाचाराचे बाळकडू प्यायले
रस्त्यावरचे डांबर गिळले
कचऱ्याचे डोंगर फस्त केले डिजीटल शिक्षणातून दही मटकावले
मिठीच्या गाळाचे पेले रिचवले
कोविड मृतांच्या टाळूवरचे लोणीही नाही सोडले
तरीही युवराज, किती ही पोटदुखी? भ्रष्टाचार करुनी उभा जन्म गेला तरी भूक नाही संपली
बेसुमार लूटमार केल्यानंतर माती रिकामी होऊन आता बहिरी झाली आहे.