सर्पदंशामुळे कल्याणमधील एका मुलाचा मृत्यूचुकीचे उपचार केल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप, उपचारात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा नाही वैद्यकीय अधिकाऱ्याच्या खुलासा

Uncategorized

कल्याण ज्यूसच्या दुकानात बसलेल्या एका १५ वर्षीय मुलाला साप चावल्याने त्याला केडीएमसीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयाने उपचार केले. मात्र मुलाची प्रकृती खालावल्याने त्याला कळवा येथील सरकारी रुग्णालयात पाठविले गेले. उपचारा दरम्यान अमित सोनकर याचा मुलाचा दुदैवी मृत्यू झाला आहे. मृत मुलाच्या नातेवाईकांनी महापालिका रुग्णालयाने निष्काळजीपणा करीत चुकीचे उपचार केल्याचा आरोप केला आहे. मात्र हॉस्पिटल चे वैद्यकीय अधिकारी यांनी सर्व आरोप फेटाळले आहे. मुलावर योग्य ते उपचार करण्यात आले होते

कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरातील सोनकर कुटुंबियांचे ज्यूसचे दुकान आहे. बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पंधरा वर्षीय अमित सोनकर हा दुकानात बसला असताना त्याला साप चावला. नातेवाईकांनी त्याला तातडीने रुक्मीणीबाई रुग्णलायात दाखल केले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला पुढील उपाचाराकरीता कळवा सरकारी रुग्णालयात पाठविले. उपचारा दरम्यान अमितचा मृत्यू झाला. सोनकर कुटुंबियांचा आरोप आहे की, अमितला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले असता त्याठिकाणी त्याला ग्लूकोज लावली गेली. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्याला कळवा रुग्णलायात नेले गेले. त्याचा काही उपयोग झाला नाही. चुकीचे उपचार केल्याने अमितचा मृत्यू झाला. अमितच्या मृत्यूला महापालिका रुग्णालय जबाबदार आहे.
याबाबत रुक्मणी बाई हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी पुरुषोत्तम टीके यांनी सांगितले मुलावर उपचार करण्यात आले होते. उपचारामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा केला नाहीये. योग्य ते उपचार करण्यात आले होते. त्याची तब्येत खालावल्याने त्याला पुढील उपचारासाठी कळवा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *