कल्याण नजीक कोंगांव बकरा मंडी की कथा
कल्याण-कल्याणनजीक असलेल्या कोनगावातील बकरा मंडीत विक्रेत्यांकडून ८ रुपये कर वसूल केला जात होता. त्यात वाढ करुन थेट २५ रुपये करण्यात आला. कर वाढ केली मात्र मंडीत सुविधा दिल्या जात नाही. सुविधा पुरविल्या तर आम्ही कर भरण्यास तयार आहोत अशी भूमिका बकरा विक्रेत्यांनी घेतली आहे.
बकरा विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष परवेज शेख यांनी माहिती दिली की, मुंबई सोडले तर सगळ्य़ात मोठा बकरा विक्रीचा बाजार कोनगावातील आहे. हा बकरा बाजार भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येतो. याठिकाणी आठवडय़ाला ३० हजार बक:यांची विक्री होती. शनिवार आणि रविवारी बाजार जास्त तेजीत असतो. एक बकरा बाजारातून विकून बाहेर नेताना त्याच्या मागे ८ रुपये कर लावला जातो. हा कर वाढविण्यात आला आहे. आत्ता २५ रुपये कर भरावा लागत आहे. कर वाढविला असला तरी त्याठिकाणी विक्रेत्याना कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही. बाजार अवघ्या दीड एकर इतक्या अपु:या जागेत चालविला जातो. त्यासाठी किमान पाच एकराची जागा उपलब्ध करुन दिली पाहिजे. जागा वाढवून दिले तर अडते वाढतील. व्यापारही वाढेल.
याठीकाणी पाण्याची सुविधा नाही. पाणी नसल्याने बकरे आणि विक्रेत्यांना त्रस सहन करावा लागतो. आत्ता उन्हाचा तडाखा आहे. त्यात बक:यांना पाणी लागते. दिवसाला २ कोटी रुपयांपेक्षा जास्तीची उलाढाल बकरा विक्रीतून होते. शनिवार आणि रविवारी ही उलाढाल ३ कोटी रुपयांच्या घरातही जाते. राज्यांतून आणि राज्याबाहेरूनही बक:यांचा माल येतो. देवनार नंतर कोन गावातील बकरा बाजार मोठा आहे. त्या तुलनेत काही सुविधा दिल्या जात नाही. सुविधा नसताना कर वाढ लादली जात आहे. वाढविलेला कर भरण्यास आमची हरकत नाही. कर वाढविण्या आधी सुविधा पुरविणो गरजेचे आहे. सुविधा दिल्यास आम्ही करही भरु असे शेख यांनी सांगितले.