कल्याण
:- भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिल लाइन पोलीस ठाण्यात गोळीबार करण्याचे घटना घडली होती. या घटनेनंतर आमदार गणपत गायकवाड यांच्या सह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता . यामध्ये आमदार गणपत गायकवाड यांच्यासह संदीप सरवनकर ,हर्षल केने यांना अटक करण्यात आले होती . याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड,विकी गणात्रा ,नागेश बडेकर हे तीन जण फरार होते . या प्रकरणात व्यावसायिक व भाजप पदाधिकारी विकी
गणात्रा याला देखील खडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतलं आहे . विकी गणात्रा याला खंडणी विरोधी पथक ने ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे