कल्याण- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून शहरातील रस्त्यांवर फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत ही अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण शीळ रोडवरील टाटा नाका ते सोनारपाडा परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा असलेली शेकडो अतिक्रमणे आज कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कारवाई पथकाने जमीनदोस्त केली.
सहाय्यक आयु्क्त भारत पवार व सहाय्यक आयु्क्त हेमा मुंबरकर यांनी ही कारवाई केली. या कारवाईसाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. जेसीबीच्या सहाय्याने फुटपाथ वरील अतिक्रमने हटविण्यात आली.