कल्याण
-दोन मित्र पार्टनर शिप मध्ये चायनीज गाडी सुरू करणार होते .या आनंदात दोघांनी पार्टी दिली.. मात्र या दारू पार्टी मध्ये शुल्लक वादातून दोघांमध्ये वाद झाला याच वादातून एका मित्राने मित्राचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व आडीवली परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घडली . वाजिद सय्यद असं मयत तरुणाचं नाव असून याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी परेश शीलकर या तरुणाला ताब्यात घेतलंय . याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय
- मलंग रोड परिसरात राहणारा परेश शिलकर आणि वाजिद सय्यद हे पार्टनरशिप मध्ये चायनीज ची गाडी सूरु करणार होते . दोघांची तयारी झाली होती .काही दिवसातच यांचे चायनीज सेंटर सुरू होणार होते .यामुळे वाजिद सय्यद आणि परेश शिलकर व त्याच्या मित्रांनी आज अडवली परिसरातील एका निर्मानाधीन इमारतीमध्ये पार्टी दिली होती . या ठिकाणी त्यांचे मित्र देखील होते .पार्टी दरम्यान वाजिद व परेश मध्ये वाद झाला या वादातून परेशने वाजिद सय्यद वर लोखंडी पत्र्याने हल्ला केला त्यात वाजिदचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे . धक्कादायक म्हणजे हल्ला केल्यानंतर परेशनेच कंट्रोल रूमला फोन करून या घटनेची माहिती दिली . मानपाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परेशला ताब्यात घेतले या प्रकरणी मानपाडा पोलिस पुढील तपास करत आहे .