हातात तलवारी घेऊन दबा धरुन बसले होते. रेस्टारेंटचा मॅनेजर जसा आला. तसा त्याच्या डोक्यावर तलवारीने हल्लाकरीत त्याच्या जवळची दीड लाखाची रोकड आणि स्कूटी घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना कल्याण पूर्व बागातील नांदीवली परिसरात घडली. जखमी मॅनेजर भीम सिंह वर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. कोळसेवाडी पोलिसांनी हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत सीसीटीव्हीच्या सहाय्याने शोध सुरु केला आहे.कल्याण पूर्व भागात काही दिवसापासून चोरांची दशहत वाढली आहे.
कशीस हॉटेल मध्ये भीमा सिंह हे मॅनेजरचे काम करतात. रेस्टारंट बंद करुन रोकड सोबत घेतली. ते नांदीवली रस्त्याने स्कूटीवरुन घरी परतत होते. काकाचा ढाबा परिसरात हल्लेखोर तलवार घेऊन दबा धरुन बसले होते. ज्या क्षणी स्कूटीवरुन भिम हे आले. तेव्हा दबा धरुन बसलेल्या चोरट्यांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात भीम हे जखमी झाले. हल्लेखोरानी भिमासिंग यांच्याकडे असलेली दीड लाखाची रोकड हिसकावून घेतली. इतकेच नाही तर त्यांच्या ताब्यातील स्कूटीही देखील घेतली. त्याठिकाणाहून हल्लेखोर पसार झाले. जखमी भिम सिंह यांना उपचारासाठी खाजगी रुग्णलायात दाखल केले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी कोळसेवडाी पोलिसांनी हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन सीसीटीव्हीच्या माध्यमातून या घटनेचा तपास सुरु केला आहे.