एक हजार रुपयांच्या घेणो देण्यावरुन झालेल्या वादात एका गॅरेज कर्मचा:याला चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आरोपींमध्ये एक मामा नावाच्या व्यक्तिचा समावेश आहे. जो या भागात हप्ता वसूलीचे काम करतो. सध्या या प्रकरणा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.
कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरात हसन खोत हा तरुण हा त्याच परिसरात असलेल्या गॅरेजमध्ये काम करतो. काही दिवसापूर्वी हसन हा एक गाडी घेऊन बाजूच्या सव्र्हीसिंग सेंटरमध्ये गेला. गाडी धुण्यासाठी उभी केली. सागर नावाच्या व्यक्तीने त्याला सांगितले की, तुमच्याकडे आधीचे एक हजार रुपये बाकी आहे. त्यावर हसनने सांगितले की, माझा मालक पैसे देणार त्याचे टेंशन तू घेऊ नको. या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. मद्यधुंद अवस्थेत सागर आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन जणांनी हसनला बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील असलेल्या धारदार चाकूने हसनवर हल्ला केला. या हल्ल्यात हसन गंभीर जखमी झाला आहे. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणात सागर माळवे याला अटक केली आहे. अन्य दोन जण पसार झाले आहेत. हसनचे नातेवाईक शाकीर शेख यांचे म्हणणो आहे की, आरोपीत एक मामा नावाचा व्यक्ती आहे की, जो या भागात दादागिरी करतो. तो लोकांकडून पैसे गोळा करतो. त्याच्या सांगण्यावरुनच हा हल्ला झाला आहे. सध्या हसनवर उपचार सुरु आहेत.