मदर इंडियाचा लाला तुम्हाला आठवत असेल मात्र कल्याणमध्ये एका व्याजखाऊ कुटुंबाने त्या लालाला लाजविणारे व्याजाचा धंदा सुरु केला आहे. धक्कादायक म्हणजे या व्याजखाऊ कुटुंबात मनसे पदाधिका:याच्या पत्नीचाही समावेश आहे. याबाबत एका व्यक्तिला 25 टक्के व्याजाने पैसे देऊन दररोजचा 800 रुपये दंड उकळणा:या व्याजखोरला अटक करुन पोलिस मनसे पदाधिका:याच्या पत्नीसह अन्य दोन जणांचा शोध घेत आहेत.
कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरात राहणारे सुशांत मोहिते हे व्यापारी आहेत. त्यांना व्यावसायासाठी काही पैशाची गरज होती. त्यांनी व्याजावर पैसे देणा:या दर्पण मंडाले यांच्याकडून दीड लाख रुपये व्याजाने घेतल.े दर्पणने 25 टक्के व्याजाने हे पैसे दिले. काही महिन्यात सुशांत याने व्याजासकट दर्पणकडे तीन लाख 54 हजार 500 रुपये परत केले. मात्र इतके सगळे करुन देखील दर्पण आणि त्याचे साथीदार व्याजाच्या रक्कमेत काही पैसे बाकी आहे. व्याज देण्यात उशिर झाल्याने दंडात्मक कारवाई म्हणून बाकी असलेले पैसे जोडून आणखीन चार लाख रुपयांची मागणी करीत होती. दर्पण यांनी सुशांतला पैसे देण्याचे सांगितले. सर्व पैसे देऊन देखील आत्ता आणखीन पैसे कुठून आणू अशी सुशांत याने विनंती केली. दर्पण काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पैशाच्या तगाद्यासाठी दर्पण, त्याची आई विजया, बहिण विशाखा रोहन अक्केवार, पत्नी मनिषा हे सुशांत यांच्या घरी गेले. त्याला जाऊन दमदाटी केली. विशाखा ही कल्याणमध्ये विभाग अध्यक्ष रोहन अक्केवार याची पत्नी आहे. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने आणि पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु झाला. दर्पण याला अटक केली आहे. अन्य तीन आरोपी पसार आहेत.