पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला…जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू
हल्लेखोर पती पसार …महात्मा फुले पोलिसांचं तपास सुरू
Anchor : -पत्नीला नोकरी करणास विरोध करत संतापलेल्या पतीने भर रस्त्यात पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची घटना कल्याणात घडली .आज सकाळच्या सुमारास कल्याण जवळ असलेल्या शहाड परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला . या हल्ल्यात पत्नी रंजीता शेट्टी ही जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर हल्ल्यानंतर पती शशिकांत शेट्टी हा फरार झालाय . महात्मा फुले पोलीस या शशिकांत यांचा शोध घेत आहेत.
कल्याण जवळ असलेल्या शहाड परिसरात एका इमारतीमध्ये शशिकांत शेट्टी व रंजीत शेट्टी हे दाम्पत्य राहते.. या दोघांचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. रंजीता मुंबई येथील विद्याविहार येथील एका खाजगी कंपनीमध्ये काम करत होती. शशिकांत शेट्टी याचा या नोकरीला विरोध होता.. शशिकांत तीन महिन्यांपासून रंजीताला कामावर जाऊ नको असे सांगत होता. यातूनच दोघा पती-पत्नीमध्ये वाद होत होते. हा वाद आज विकोपाला गेला .सकाळी शशिकांतने रंजिताला कामावर जाऊ नको असे सांगितले मात्र रंजीता कामावर जाण्यास निघाली .शशिकांत तिचा पाठलाग करत शहाड परिसरातच तिला रस्त्यात गाठले व तीच्यावर चाकूने हल्ला केला .या हल्ल्यात रंजिता ही गंभीर जखमी झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्ल्यानंतर पती शशिकांत शेट्टी हा पसार झाला आहे याप्रकरणी महात्मा फुले पोलीस तपास करत असून फरार झालेल्या शशिकांत याचा शोध घेतात