बैलबाजार प्रभागात पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला प्रारंभ

Uncategorized

युवासेना कल्याण पश्चिम विधानसभा समन्वयक प्रतिक पेणकर यांच्या पाठपुराव्याला यश

कल्याण : बैलबाजार प्रभागात पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला प्रारंभ झाला असून युवासेना कल्याण पश्चिम विधानसभा समन्वयक प्रतिक पेणकर यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

बैलबाजार प्रभाग क्रमांक ३६ पॅनल क्रमांक १४ परीसरातुन सर्वोदय मॉल, भानुनगर, लक्ष्मी मार्केट पाठीमागे व्हाया जरीमरी मोठा सांडपाण्याचा नाला आहे. हा नाला सांडपाणी वाहुन नेणारा प्रमुख नाला आहे. नाला घाण व कचरा यामुळे संपूर्ण भरलेला आहे. त्यामुळे सांडपाणी वाहुन जाण्यास अडथळे येत होते. पावसाळ्यात अतिवृष्टी मुळे ही पुरसदुश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व्हावी यासाठी युवासेना समन्वयक प्रतिक प्रकाश पेणकर यांनी महापालिका पञव्यवहार करुन पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुरावा यश येऊन आजपासून महापालिकेच्या वतीने नालेसाफसफाईला सुरुवात झालेली आहे. बैलबाजार, जोशीबाग, लक्ष्मीमार्केट, शिवाजी चौक, चिखलेबाग ह्या सकल परीसरात पावसाळ्यात अतिवृष्टी मुळे संपूर्ण परिसर जलमय होऊन पुरसदुश्य परिस्थिती निर्माण होते. पावसाळ्यापूर्वीच नालेसफाई सुरुवात झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *