उद्धव ठाकरे नंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण डोंबिवली दौऱ्यावर

Uncategorized

विविध विकास कामांचा आढावा तसेच विकास कामांचं लोकार्पण

Kalyan :-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील आठवड्यात दौऱ्यावर येणार असल्याची माहिती कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली . या दौरादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण डोंबिवली मधील विविध विकास कामांचा आढावा घेणार असून काही विकास कामाचा लोकार्पण देखील करण्यात येणार आहे . उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत शहर शाखांना भेट दिल्या होत्या यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती . त्या पाठोपाठ आता पुढील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण डोंबिवली दौऱ्यावर असल्याने एकनाथ शिंदे पदाधिकारी कार्यकर्त्यांना काय सूचना देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे . .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *