कल्याण डोंबिवली जिल्ह्यात यंग इंडिया के बोल स्पर्धेचे आयोजन
कल्याण : युवक कॉंग्रेसने प्रवक्ता नियुक्तीसाठी वक्तृत्व स्पर्धचे आयोजन केले आहे. जिल्हा, राज्य तसेच देशस्तरावर युवक कॉँग्रेस याच पद्धतीने प्रवक्ते पदावर नियुक्त्या करणार आहे. यंग इंडिया के बोल’ असे या उपक्रमाचे नामकरण करण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवली युवक काँग्रेसतर्फे आज यंग इंडिया के बोल सीझन २ या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते जयेश गुरणानी, प्रदेश प्रवक्ते प्रभात झा, सरचिटणीस व जिल्हा प्रभारी अतिशा पैठनकर, जिल्हाध्यक्ष मनीष देसले, जिल्हा सरचिटणीस प्रसन्न ताकपेरे, ब्लॉक अध्यक्ष भूपेश सिंग उपस्थित होते.
आजच्या काळात जिथे सरकार तरुणांचा आवाज दाबण्याचे काम करत आहे, तिथे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय युवक काँग्रेस तरुणांना आवाज उठवण्यासाठी एक माध्यम देत आहे. समस्या मांडू शकतात. यंग इंडिया के बोल सीजन २ या कार्यक्रमाला महाराष्ट्रात १५ एप्रिल रोजी नागपूर शहरातून मान्यता मिळाली असून आज याची घोषणा कल्याण-डोंबिवली जिल्ह्यात करण्यात आली. भारतीय युवक काँग्रेस या “यंग इंडिया के बोल” चे माध्यम देत आहे, जेणेकरून तरुणांना त्यांचे मन मोकळे करता येईल आणि राष्ट्राशी संबंधित प्रश्नांवर त्यांचे विचार मांडता येतील.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी दिलेल्या लिंकद्वारे नोंदणी करता येईल, ज्याची अंतिम तारीख ३१ मे आहे. त्यानंतर १ जून ते ३१ जुलै या कालावधीत विधानसभा आणि जिल्हास्तरावर होणार आहे. १ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या कालावधीत राज्यस्तरावर असेल आणि, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा ३० सप्टेंबर, १, २ ऑक्टोबर रोजी होणार आहेत.