ग्रामीण भागातील अमृत योजने अंतर्गत सुरू असलेल्या कामाचा माजी स्थायी समिती सभापतीनी घेतला आढावा

Uncategorized

Anchor: कल्याण ग्रामीण भागात माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आज केडीएमसी अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला.. या भागात असलेल्या पाणीटंचाईची समस्या देखील जाणून घेतली.या भागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी उद्या पालिका आयुक्तांसमवेत बैठक घेणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले

कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती दीपेश मात्रे यांनी आज पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसोबत कल्याण ग्रामीण मधील गोलवली, दावडी , सोनारपाडा व मानपाडा या गावांमध्ये अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला . या अमृत योजनेअंतर्गतप्रत्येक विभागाकरिता स्वतंत्र जलकुंभ बांधून देण्यात येणार आहे जेणेकरून भविष्यात पाण्याची कमतरता भासणार नाही. सध्या या चारही विभागात पाणी कमी प्रमाणात देण्यात येत आहे , यावरही तोडगा काढण्याकरिता उद्या महापालिका आयुक्तांसोबत बैठक आयोजित तेलाची माहिती दीपेश म्हात्रे यांनी दिली.सदर भागातील पाण्याचा प्रश्न येत्या चार महिन्यात सोडविण्यात येईल अशी ग्वाही संबंधित ठेकेदाराने दिली . यावेळी माजी नगरसेवक जालींदर पाटील ,नकुल गायकर ,मुकेश पाटील कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभागाचे शैलेश कुलकर्णी ,योगेश म्हात्रे ,आशु सिंह ,मुकेश भोईर स्वप्निल विटकर पवन म्हात्रे अक्षय गायकर सचीन कासार व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *