सोनाग्राफीचा रिपोर्टे चुकीचा दिल्याने एका गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर हलगर्जीपणा करणा:या डॉक्टरच्या विरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरचे नाव अमोल ज्ञानदेव वानाईत असे आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत .
2021 साली 24 मार्च ते 18 एप्रिल र्पयत अश्वीनी गणेश साळूंके या 28 वर्षीय गर्भवती महिलेवर कल्याण सिंडीकेट येथील वैष्णवी खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. वैष्णवी हॉस्पिटलचे डॉ अश्विन कक्कर यांनी सोनोग्राफी रिपोर्ट साठी सोनोग्राफी तज्ञ डॉ अमोल वानाईत यांच्याकडे पाठविले. सोनोग्राफी करण्यात आली. डॉ. अमोल वानाईत या सोना ग्राफी तज्ञाने जो रिपोर्ट दिला. तिच्यावर अश्विन कक्कर यांनी उपचार सुरू केले. उपचारादरम्यान गर्भवती अश्विनी साळुंखे हिच्या मृत्यू झाला. मयत साळूखे हिच्या सोनाग्राफी अहवालानुसार तिच्या पोटातील गर्भाची वाढ होत नसल्याने तिला गर्भपाताच्या गोळया खाण्यास दिल्या होत्या. या गोळया खाल्ल्याने 18 एप्रिल 2021 रोजी मयत झाली. सोनाग्राफी तज्ञ डॉ. अमोल वानाईत यांच्या चुकीच्या रिपोर्ट आणि हलगर्जीपणा अश्वीनी साळुंखे हिचा मृत्यू झाल्या आहे. तसा अभिप्राय ठाणे जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिला. अश्वीनीच्या मृत्यूस सोनाग्राफी तज्ञ डॉ. वानाईत हे जबाबदार आहे. त्यामुळे कोनगाव पोलिस ठाण्यात डॉ. वानाईत यांच्या विरोधात 304 (.अ )अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोनगाव पोलिसांकडून सुरू आहे