कल्याण
भाजपाच्या डोंबिवली पूर्व मंडळाचे अध्यक्ष नंदू जोशी यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणारी पीडित महिलाही भाजपाच्या ग्रामीण मंडळाची पदाधिकारी आहे. या महिलेने गुरूवारी पोलिस ठाण्यासमोरच प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. यावेळी तिने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर आपल्या जीवाला आरोपीकडून धोका निर्माण झाला असल्याची कैफियत मांडली. ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्याची मागणी या महिलेने केली आहे.आरोपी नंदू जोशी हे शरीरसुखाची मागणी करत असल्याची तक्रार डोंबिवलीतील भाजपाच्या वरिष्ठ नेत्या-पदाधिकाऱ्यांकडे करूनही मला कुणाकडूनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे गेल्या पाच-सहा वर्षांपासून मी त्याचा हा त्रास सहन करत आहे. अखेर माझी सहनशीलता संपली आणि मी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल झाली. गुन्हाही दाखल झाला आहे. सात ते आठ दिवस झाले तरी अद्याप आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होताच तुला जीवे ठार मारणार असल्याचीही आपणास आरोपी जोशी याच्याकडून धमकी दिली जात असल्याचा आरोप पीडितेने केलाय . त्याच्या दहशतीमुळे घराबाहेर पडणे ही मुश्किल झाले आहे. त्यामुळे त्याला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी, अशी माझी मागणी असल्याचे पीडित महिलेने पत्रकारांना सांगितले. ही महिला या संदर्भात तक्रार देण्यासाठी गुरूवारी रात्री मानपाडा पोलिस ठाण्यात आली होती.
डोंबिवली पूर्व भाजप मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला .त्यानंतर भाजप ने आक्रमक पवित्रा घेत मोर्चा काढत पोलिसांनी हा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला .या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली करण्याची भाजप ने केली…या प्रकरणी भाजप आक्रमक झाली आहे ..याच मुद्द्यावरून मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहकार्य करणार नसल्याचा ठराव देखील आजच भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला होता.. त्यानंतर आज संध्याकाळी या प्रकरणातील पिडीतेने
गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदू जोशी धमकावत असल्याचा आरोप केलाय .मानपाडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची दोन दिवसात बदली करतो त्यानंतर तुला मारतो अशी धमकी दिल्याचा पीडितेचा आरोप आहे . नंदू जोशी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडीतेने केली तसेच धमकी दिल्या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात असल्याचे पीडितेने सांगितले.त्यामुळे आता पोलिस काय भूमिका घेतात हे महत्वाचे ठरणार आहे .