आमचे खासदार हवेत किंवा ट्विटर आश्वासन देत नाही, दिव्याची पंढरी होणार, वारकरी भावनाचा भूमिपूजनावरून शिवसेना नेत्याकडून मनसे आमदारांवर टीका

Uncategorized

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने दिव्यात वारकरी भवन तयार होत आहे. दिव्याची पंढरी होणार. मात्र काही लोकांनी घोषणा केली होती स्वखर्चातून आगरी कोळी वारकरी भवन बांधू त्याचे काम सुरू झाले नाही अशी टीका शिवसेना युवासेनेने दीपेश म्हात्रे यांनी नाव न घेता मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर केली आहे आता मनसे कडून काय प्रत्युत्तर येतो हे पाहणे महत्त्वाच्या ठरणार आहे

डोंबिवली व दिव्याच्या वेशीवर प्रशस्त आगरी कोळी वारकरी भवन उभारण्यात येणार आहे . खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हे वारकरी भवन उभारण्यात येणार आहे . या बास्तूचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व पक्ष संघर्ष समितीचे अध्यक्ष गुलाब वझे शिवसेना युवासेना नेते दीपेश म्हात्रे शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे शिवसेना पदाधिकारी अर्जुन पाटील आणि वारकरी संप्रदायाचे मान्यवर उपस्थित होते 27 गाव सर्वपक्षीय संघर्ष समिती व वारकरी संप्रदायाकडून गेल्या अनेक महिन्यांपासून कल्याण लोकसभा क्षेत्रात आगरी कोळी वारकरी भवन उभारण्याची मागणी केली जात होती ..खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनंतर अखेर वारकरी भवनाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. वारकरी भवणामुळे दिव्याची पंढरी होईल असे संघर्ष समितीने आज पत्रकार परिषदेत सांगितले

कसं असणार आगरी कोळी वारकरी भवन

सात जून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार आहे . टाळ मृदुंग हाती घेत सुमारे दोन हजार वारकरी स्वागतासाठी येणार आहेत . या वास्तू मध्ये प्रशस्त हॉल, आगरी कोळी समाजाच्या रूढी परंपरा ऑडियो व विज्वल स्वरूपात दाखवण्यात येणार , वारकरी संप्रदायासाठी भक्तिमय वातावरण , वारकरी संप्रदायाचे प्रशिक्षण घेण्याची सुविधा असणार आहे .

काहीनी आगरी कोळी वारकरी भवन स्वखर्चातून बांधू असे बॅनर लावले मात्र त्यांच्या खर्चाची काही तरतूद झालेली दिसत नाही – युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांचा मनसे आमदार राजू पाटील यांना टोला

यावेळी युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी नाव न घेता मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर टीका केली ..म्हात्रे यांनी काही लोकांनी स्वखर्चातून आगरी कोळी भवन बांधू अशी घोषणा केली होती मात्र त्याचे कुठे काम सुरू असलेले दिसत नाही ..खासदार शिंदे हवेत व ट्विटरवर आश्वासनं देत नाहीत ..खासदार श्रीकांत शिंदे प्रत्यक्षात काम करणारे आहेत… काही लोकांनी पोस्टर बॅनर रस्त्यावर आगरी कोळी वारकरी भवन बांधू स्वखर्चातून अशा बॅनर लावले होते . मात्र काम सुरू झालेला नाही नाही असा टोला नाव घेता मनसे आमदार राजू पाटील यांना लगावला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *