डोंबिवली :-नंदू जोशी प्रकरणात काँग्रेसने आता पिडीतेला पाठिंबा दिलाय. पिडीतेने नंदू जोशी यांना अटक करण्याची मागणी करत गेल्या आठ दिवसांपासून मानपाडा पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केलंय. उपोषण स्थळी आज काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले जिल्हाध्यक्ष सचिन पोटे नवीन सिंह यांच्यासह शिष्टमंडळाने पिडीतेची व पोलिसांची भेट घेतली.. यावेळी या प्रकरणातील भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांना तत्काळ अटक करा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला .
यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांनी पिडीतेच्या तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल होतो गुन्हा दाखल केल्यानंतर साधी चौकशीसाठी सुद्धा बोलावलं गेलं नाही ..भाजपमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस काम करतात.. पिढी त्याला न्याय देणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवले जाते हा कोणता न्याय ? असा सवाल करत यावरून भाजपची मानसिकता समजते या मानसिकते विरोधात जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर काँग्रेस तर्फे आंदोलन छेडण्यात येईल काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले देखील या आंदोलनात सहभागी होतील असा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिला . एकंदरीतच भाजप पदाधिकारी नंतर जोशी यांचे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध घडामोडी घडताना दिसतायत.भाजपचा मोर्चा ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले ,शेखर बागडे यांची बदलत होत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहकार्य न करण्याचा ठराव .. त्यापाठोपाठ श्रीकांत शिंदे यांची राजीनाम्याची तयारी ..शिवसेना भाजप मध्ये वादाची ठिणगी,भाजपकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्यावर मालमत्ता जमा केल्याचा आरोप,विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील शेखर बागडे यांच्या चौकशीची केलेली मागणी , त्यातच आता काँग्रेसने पिढीतला पाठिंबा देत आरोपीला अटक करा अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा पोलिसाना दिलाय.. एकंदरीतच या प्रकरणानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालेय .