कल्याण-हुंडय़ासाठी सुनेला बेदम मारहाण करणा:या पोलिस अधिका:यासह त्याच्या कुटुंबातील चार जणांच्या विरोधात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखळ करीत पुढील तपास सुरु केला आहे. सर्व आरोपी फरार आहेत.
कल्याणमध्ये राहणारे पोलिस अधिकारी श्यामलाल पवार हे कल्याण पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत आहे. श्यामलाल पवार यांची सून भूमिका पवार यांनी श्यामलाल पवार आणि त्यांच्या दोन नणंदा, सासू आणि नव:यावर गंभीर आरोप केले आहेत. माहेरुन दागिने घेऊन ये असा तगादा भूमिका हिच्या मागे लावला. दररोज या कारणावरुन तिला मारहाण करीत होते. श्यामलाल पवार यांचा मुलगा प्रतिम याच्यासोबत भूमिकेचा 2क्19 साली लग्न झाले होते. लग्नानंतर भूमिकेला त्रस देण्यास सुरुवात झाली. कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दिली. चौकशी अंती पोलिसांनी श्यामलाल पवार, त्याचा मुलगा प्रितम पवार, त्यांची मुलगी पल्लवी पवार आणि दुसरी मुलगी प्रियंका राठोड आणि सासू जिजाबाई पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेले सर्व आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.