मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमला स्थानिक मनसे आमदारांना निमंत्रण नाही, आश्चर्य :

Uncategorized

दिवा येथे उभारण्यात येणाऱ्या वारकरी भवना वरून शिवसेना मनसेमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते दीपेश मात्रे व मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते.आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या वारकरी भवनाचे भूमिपूजन होणार आहे.. या कार्यक्रमाला मनसे आमदारांना आमंत्रण दिले नसल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.

कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांच्या यांच्याकडून स्वखर्चाने वारकरी भवन उभारण्याची घोषणा करण्यात आली होती यासाठी त्यांनी जागा निश्चित केली होती.. मात्र या वारकरी भवनाचे काम सुरू झाले नाही. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिव्यात काही विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे .त्यामध्ये वारकरी भवनाचे देखील भूमिपूजन करण्यात येणार आहे . यासंदर्भात शिवसेनेकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत युवा सेना नेते दीपेश म्हात्रे यांनी वारकरी भवना वरून मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर टीका केली. त्यानंतर राजू पाटील यांनी वारकरी भवनाच्या जागेसाठी स्थानिक नेत्यांनी अडथळे आणले .मात्र वारकरी भवन होणारच अशी भूमिका स्पष्ट केली होते . ठाणे महानगरपालिकेकडून हा कार्यक्रम होणार आहे मात्र स्थानिक आमदारांनाच आमंत्रण नसल्याने प्रश्नच निर्माण झाला आहे आज होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मनसे आमदार राजू पाटील यांना आमंत्रण देण्यात आले नाही . वारकरी भवनासाठी अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायाची मागणी आहे मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नानंतर सरकारने वारकरी भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे मनसे कडून सांगितला जात आहे. मात्र मनसे आमदार राजू पाटील यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *