व्यावसायिकाला मारहाण करत मागितले दोन लाखाची खंडणी
Kalyan : एका व्यावसायिकाला मारहाण करत लाखो रुपयांची खंडणी मागणाऱ्या दाढी बंधूंच्या विरोधात कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.. दाढी आणि त्याच्या साथीदाराचा शोध पोलिसांनी सुरू केला.. पुन्हा एकदा दाढी कंपनी कल्याण मध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आता समोर आले आहे . व्यावसायिकाला मारहाण करण्याची घटना देखील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे .
कल्याण पूर्वेतील व्यावसायिक सुरेश काळे कल्याण पश्चिमेकडील एका हॉटेल मध्ये बसले असताना त्या ठिकाणी काही लोक आली .त्यांनी सुरेश यांना विचारपूस केली… तू सुरेश काळे आहेस ना मोठ्या व्यावसायिकांसोबत तुझी पार्टनरशिप आहे.. आम्हाला पण पैसे दे..इतकेच नव्हे तर या तरुणांनी सुरेश यांना मारहाण करत 2 लाख आणून दे असे सांगितले .जेव्हा सुरेश यांनी हॉटेल मधील सीसीटिव्ही काढत विचारपूस केली तेव्हा दादागिरी करत खंडणी मागणारे दाढी कंपनीची लोकं आहेत .या नंतर सुरेश काळे यांना कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात दाढी बंधूनी हटकले .याबाबत सुरेश काळे यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीनुसार कोळशेवाडी पोलिसांनी रवी दाढी, किरण दाढी, सैम खाडे आणि बबल्या विरोधात गुन्हा दखल करत तपास सुरू केला आहे .दरम्यान दाढी कंपनीची कल्याण भागात दहशत होती .मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या कारवाया थंडावल्या होत्या .आता या घटने निमित्त दाढी कंपनी पुन्हा एकदा hi सक्रिय झाल्याचे दिसून येतेय ..