कल्याणात शिक्षण तज्ञाचे ३९ दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आत्मक्लेश उपोषण
Anchor : राज्यात १० वी -१२ वी च्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असून या आत्महत्या टक्केवारीची स्पर्धा,त्यातून निर्माण होणारा अभ्यासाच्या तणाव यातून होत असल्याचे समोर आले आहे .या आत्महत्या थांबवण्यासाठी १० वी -१२ वी मध्ये शिकणाऱ्या मुलांचे समुपदेशन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे …काही ठिकाणी हे समुपदेशन होत असते मात्र बहुतांश शाळांमध्ये कॉलेजेस मध्ये समुपदेशन करण्यात येत नाही… या त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे समुपदेशन याची मागणी करत शिक्षण तज्ञ महेंद्र बैसाने उर्फ भारू काका यांनी कल्याणमध्ये राहत्या घरीच अन्नत्याग आत्मक्लेष उपोषण सुरू केलेय… तब्बल 39 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे…सुरुवातीच्या काही दिवस संबंधित विभागाचे अधिकारी बैसाने यांच्याकडे गेले..म त्यांची भेट घेतली… मागण्या समजून घेतल्या मात्र त्यानंतर आजमीतिला एकाही अधिकाऱ्याने त्यांच्याकडे ढुंकूनही बघितले नाही…त्यामुळे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत अन्नत्याग उपोषण सुरूच राहणार असल्याचे बईसाने यांनी सांगितले
व्हिओ : महाराष्ट्र राज्यात १० वी -१२ वी च्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत .आजच्या घडीला सुरू असलेली टक्केवारीची स्पर्धा त्यातून विद्यार्थ्यांच्या मनावर येणारे दडपण ,तणाव त्यामुळे विद्यार्थी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे बहुतांश घटनांमधून समोर आले आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना होणे गरजेचे आहे.. या विद्यार्थ्यांचं,त्यांच्या पालकांचं समुपदेशन केल्यास विद्यार्थी असं टोकाचे पाऊल उचलणार नाहीत.. राज्यातील अनेक काही शाळांमध्ये कॉलेजमध्ये समुपदेशनाची सुविधा उपलब्ध आहे मात्र बहुतांश शाळा याकडे दुर्लक्ष करत आहेत याबाबत शिक्षण तज्ञ महेंद्र बैसाणे यांच्याकडून गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने शासनाकडे, सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे …मात्र अद्यापही कोणतेही ठोस पाऊल शासनाकडून उचलण्यात आले नाही.. अखेर याबाबत महेंद्र बैसाणे यांनी कल्याण येथील राहत्या घरातच अन्नत्याग आत्मक्लेष उपोषण सुरू केले …13 सप्टेंबर रोजी त्यांचं हे उपोषण सुरू झाले… आज 39 दिवस उलटलेत मात्र उपोषण सुरूच आहे …. पंधरा दिवसांपूर्वी संबंधित विभागाचे अधिकारी बैसाणे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले होते मात्र त्यानंतर अद्यापही काहीच निर्णय दिला नसल्याचा माहिती बैसाणे यांनी दिली. विद्यार्थी आत्महत्या सोबतच त्यांनी महिला बाल अत्याचार रोखण्यासाठी देखील शासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे देखील सांगितलं… या दोन्ही मागण्या संदर्भात त्यांनी राहत्या घरीच उपोषण सुरू केलं असून जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा महिंद्र बैसाणे यांनी सांगितलं
Byte महेंद्र बैसाने