कमानी पडलीच असती पण पोलिसांनी पकडून धरली आणि मोठा अनर्थ टळला
कल्याण :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सुभाष चौक परिसरात भली मोठी कमान लावण्यात आली होती .सायंकाळच्या सुमारास ही कमान हलु लागल्याने पोलिसांनी तात्काळ प्रसंगावधान राखत कमाणीच्या दिशेने धाव घेतली व ही कमान पकडून ठेवली . भर रहदारीच्या रस्त्यात ही कमान जर पडली असती तर मोठा अनर्थ घडला असता मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे हा अनर्थ टळला .याबाबत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली .सध्या ही कमान काढण्याचं काम सुरू आहे . दरम्यान सण उत्सवादरम्यान स्वागत शुभेच्छा देण्यासाठी भर रस्त्यात मोठ्या कमानी लावल्या जातात मात्र सुरक्षिततेचे कोणतेही उपाययोजना केले जात नाही त्यामुळे अनेकदा दुर्घटना घडतात .