कल्याण-एका बारा वर्षीय मुलीची एका तरुणाने छेड काढली. घटना माहित पडताच मुलीच्या बापाने त्याच्या काही मित्रांसह छेड काढणा:या तरुणाला गाठले. छेड काढण्या:या तरुणाचे अपहरण करुन बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी मुलीच्या बापासह काही लोकांना अटक केली आहे.
कल्याणमध्ये राहणा:या नूपूर चव्हाण नावाच्या तरुणाने एका बारा वर्षीय मुलीची छेड काढली. मुलीने घडला प्रकार घरातील लोकांना सांगितला. हे ऐकताच मुलीच्या बापाने त्याच्या काही मित्रांना बोलावून घेतले. छेड काढणा:या नूपूरचे कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौकातून अपहरण केले. त्याला एपीएमसी मार्केटच्या आवारात घेऊन गेले. त्याठिकाणी नूपूरला बेदम मारहाण केली. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी छेड काढणा:या नूपूर चव्हाणच्या विरोधात पोक्सा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कायदा हाती घेणा:या मुलीच्या बापासह राहूल सोनावणे, सोनू शेख, गणेश अहिरे, संजय गुप्ता, दीपक वाघ सह अन्य काही लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यापैकी काही जणांना पोलिसांनी अटक करुन कल्याण न्यायालयात हजर केले आहे.