कल्याण-
राज्यभरात पोलिस ट्रेनिंग सेंटर चालविली जातात. त्या ट्रेनिंग सेंटरमधून भरमसाठ फी वसूल केली जाते. त्यामुळे सामान्य कुटुंबातील तरुण तरुणीना पोलिसात भरण्याची इच्छा असून देखील भरसाठ फि मुळे ते शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन कल्याण पूर्व भागाचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या मतदार संघातील नेवाळी येथे मोफत पोलिस ट्रेनिंग सेंटर सुरु केले. त्याच ट्रेनिंग सेंटरमधून सराव करु आज चार जणांची पोलिसात भरती झाली आहे. त्यांना नोकरी मिळाली आहे.
केवळ आपल्या मतदार संघापूरता विचार न करता ठाणे, कर्जत, कसारा भागातील तरुण तरुणींकरीता मोफत पोलिस ट्रेनिंगची सुरुवात सात महिन्यापूर्वी आमदार गायकवाड यांनी नेवाळी येथे सुरु केले. या ट्रेनिंग सेंटरमध्ये सामान्य कुटुंबातील तरुण तरुणांनी नाव नोंदविले. पहिल्या महिन्यात १८० तरुण तरुणींना या माेफत पोलिस ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांचे नाव नोंदविले. त्यांना नियमित प्रशिक्षण दिले गेले. त्यासाठी मैदान, प्रशिक्षक आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ज्या काही आवश्यक सोयी सुविधा आहेत. या सोयी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पोलिस भरतीच्या लेखी परिक्षेकरीता १२०० रुपये किंमतीचे एक पुस्तक आवश्यक असते. हे पुस्तक देखील प्रत्येक सराव करणाऱ्या तरुण तरुणीला आमदारांनी मोफत उपलब्ध करु दिले आहे. सात महिन्यात या मोफत ट्रेनिंग सेंटरमधून सराव करुन चार जणांची पोलिस खात्यातील नोकरीकरीता निवड झाली आहे. त्यामध्ये शिवाजी गायकर, (कल्याण) अविनाश म्हात्रे, (खरड) प्रणव माने,(कल्याण) या तिघांची पोलिसात तर कोमल पावशे (कल्याण पूर्व ) महाराष्ट्र राज्य सुरशा बल यामध्ये निवड झाली आहे. आमदारांकडून सर्व जणांचे सत्कार करण्यात आले