एका आठवडय़ात कल्याण शहराला नव्या शहर प्रमुख आणि कार्यकारीणी मिळणार असा विश्वास शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे. े कल्याण पश्चिमेतील बल्याणी परिसरात माजी नगरसेविक मयूर पाटील आणि नमिता पाटील यांच्या प्रभागातील रस्ते विकास कामाचा नारळ आमदार भोईर यांच्या हस्ते फोडण्यात आला. यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.
कल्याण पश्चिमेतील बल्याणी परिसरात अनेक वर्षापासून रस्त्याचे काम रखडले होते. या कामासाठी स्थानिक माजी नगरसेवक मयूर पाटील आणि नमिता पाटील यांच्याकडून महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते दुर्गामाता मंदीरार्पयत रस्ते विकास कामाला सुरुवात होणार आहे. या रस्ते विकास कामाकरीता महापालिकेकडून 9 कोटी 24 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार भोईर यांच्या हस्ते या रस्ते विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. भाजपकडून या रस्त्यासाठी काही दिवसापूर्वीच आंदोलन करण्यात आले होते. या प्रसंगी नगरसेवक मयूर पाटील यांनी सांगितले की, विरोधकांना माहिती होते की या रस्त्याचे मंजूर झाले आहे. त्याच्या शुभारंभही करण्यात येणार आहे. तरी देखील त्यांनी आंदोलन केले. एखाद्या कामाला काय प्रक्रिया पार पाडावी लागते हे विरोधकांना माहिती नाही. कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात शिंदे गटाची कार्यकारीणी अद्याप घोषित झालेली नाही. त्यामुळे कार्यकत्र्यामध्ये संभ्रमाचीस्थिती आहे. शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, शहर प्रमुख पदासाठी अनेक जण इच्छूक आहे. कार्यकारीणी जाहिर न झाल्याने कार्यकत्र्याच्या मनात अनेक प्रश्न आहे. ठाकरे गटाने शहर प्रमुख पदाची घोषणा केल्यानंतर अद्याप शिंदे गटाकडून शहर प्रमुखाची घोषणा केली गेली नाही. लवकरात लवकर ही घोषणा केली जावी अशी शिंदे गटाची आपेक्षा आहे. आमदार भोईर यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. काही एक संभ्रमाची परिस्थिती नाही. दसरा मेळाव्यात ज्यांना बीकेसीवर जायचे होते. ते बीकेसीवर आले. ज्यांनी शिवतिर्थावर जायचे होते. त्या ठिकाणी गेले. आज बैठक आहे. आज बैठकीत निष्पन्न होईल. साधरणत: आठवडा भरात शिंदे गटाची कार्यकारीणीही जाहिर होईल असे भोईर यांनी सांगितले.