महापालिकेत राहून मनाचा पाडा या परिसरात रस्ते नाही, पाणी नाही, लाईट नाही. त्यांना स्मार्ट सिटी नको परंतू लाईट पाणी रस्ते हा मूलभूत अधिकार आहे. तो त्यांना मिळाला पाहिजे. हे पाडे महापालिकेत हे सांगायला देखील लाज वाटते अशी खंत शिंदे गटाचे कल्याणचे आमदार विश्वनाथ भाेईर यांनी व्यक्त केली आहे. अधिकारी निर्ढावलेले आणि सूस्त आहेत असेही त्यांनी बोलून दाखविले आहे.
कल्याण पश्चिेमेचे शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून विविध प्रभागात विकास कामांचे भूमीपूजन आणि उद्घाटने सुरु आहेत. काल रविवारी ते टिटवाळा परिसरात होते. त्यांनी काही विकास कामाचे भूमीपूजन केले. या दरम्यान त्यांनी टिटवाळा मनाचा पाडा या भागात लोकांची परिस्थिती पाहून त्यांनी खंत व्यक्त केली. या भागात रस्ते नाही. पाणी नाही. लाईट नाही. या मनचाच्या पाड्यालगत चारही बाजूला खाजगी जागा आहे. रस्ता करणे आणि पाण्याची लाईन टाकण्यात अडचणी येतात. या परिसराला त्यांनी ३ वेळा भेट दिली आहे. या वेळी बोलताना ते थोडे भावूक झाले. महापालिका ही स्मार्ट सिटी कडे चालली आहे. परंतू असेही काही भाग आहे. जी स्मार्ट सीटीला बाधक आहेत. लोक सांगत असताना रस्ता पाणी आणि लाईट पाहिजे. पाड्याच्या बाजूने डीपी रस्ता जातो. तो करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या रस्त्याने गाव जोडला जाणार आहे. हा रस्ता झाला तर या गावावचा रस्त्याचा आणि लाईटचा प्रश्न मिटणार आहे. माझे कर्तव्य मी पार पडतोय. जर तरच्या गोष्टीत काही फायदा नाही.
हे पाडे महापालिकेत आहे हे सांगायला देखील आम्हाला लाज वाटतेय. याठिकाणी स्मार्ट सिटी नको. मात्र त्यांना रस्ते, पाणी, वीज मिळावी हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. याकडे आमदारांनी लक्ष वेधले आहे.