पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याच्या पालिका आयुक्तांच्या सूचना
डोंबिवली जवळ असलेल्या निळजे परिसरात खाडीत जलपर्णी जमा झाल्याने आणि नाले साफसफाई अभावी रस्त्यांवर काही घरांमध्ये पाणी शिरते. त्यामुळे निळजे परिसरात साफसफाई करण्यात यावी या मागणीसाठी राजू पाटील यांनी पाठपुरावा सुरू होता.या पार्श्वभूमीवर यंदा महापालिकेकडून नाले सफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली . या कामांची आज महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्यासह मनसे पदाधिकारी योगेश पाटील माजी नगरसेवक प्रभाकर जाधव यांनी पाहणी केली. नाल्यांचे सफाई आणि रस्त्यांचे काम पावसाळ्या आधी पूर्ण करावेत अशा सूचना महापालिका आयुक्त यांनी संबंधित ठेकेदारांना दिल्या
डोंबिवली जवळील निळजे भागत असलेला खाडीला जलपर्णीने वेढा घातलाय. वेळीच या जलपर्णीला काढली नाही तर परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची होण्याची भीती आहे.या संदर्भात वेळोवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील हे पाठपुरावा करत आहेत.या संदर्भात आज केडीएमसी आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्यासह मनसेचे उपजिल्हा अधक्ष योगेश पाटील आणि माजी नगरसेवक प्रभाकर जाधव यांनी या परिसराची पाहणी केली. मनसे पदाधिकाऱ्यांनी लोढा हेवन मधील सुरु असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण आणि नाले सफाई लवकरात लवकर करून घेण्याची मागणी आज आयुक्तांकडे केली आहे. या पाहणी दरम्यान महापालिका आयुक्त दांगडे यांनी नालासोफाई चे कामे व रस्त्यांचे कामे हे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावीत अशा सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या