कल्याणात मनसे नगरसेविकेचे राज ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे यांना आवाहन…
केडीएमसी मुख्यालयासमोर झळकला बॅनर
Anchor :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदार शिंदे-फडणवीस सरकार मध्ये सहभागी झाले ..अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्या निमित्ताने राज्यात नवं राजकीय समीकरण जुळलेलं असताना दुसरीकडे या राजकारणावर मात करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र यावे अशी चर्चा मनसे व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे ..पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचं आवाहन केलं जात आहे.या आशयाचे बॅनर देखील काही शहरात झळकले होते . राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी
कल्याण मध्ये देखील मनसे कार्यकर्त्यांकडून आवाहन करत केडीएमसी मुख्यालयासमोर बॅनर लावण्यात आलाय. महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र या….हीच ती योग्य वेळ, महाराष्ट्राला राजकारण नको ,तर महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही एकत्र यावे फक्त, महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा असा मजकूर या फलकावर आहे.या बॅनर वर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे ,उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत …या बॅनर च्या माध्यमातून आर्त हाक देण्यात आली आहे. मनसेच्या माजी नगरसेविका मीनाक्षी डोईफोडे यांनी हे बॅनर लावले आहेत.भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना सत्तेत असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र यावे अशी चर्चा आता रंगू लागली आहे. मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्ते तशी कुजबुज करू लागले आहेत ..ही कुजबुज आता बॅनरच्या माध्यमातून समोर येत आहे .त्यामुळे आता दोन्ही नेते काय निर्णय घेतात ? हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे