24 तासात 11 मोबाईल चोरी. 7 सराईत चोरटे गजाआड, कल्याण जीआरपी पोलिसांची कामगिरी

Uncategorized

कल्याण कल्याण आणि आसपासच्या रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. धक्कादायक मध्ये गेल्या 24 तासात कल्याण व शहाड रेल्वे स्थानकावर एकूण अकरा मोबाईल चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या..या पार्शवभूमीवर कल्याण रेल्वे पोलिसांनी चांगली कामगिरी करत अवघ्या काही तासाच्या आत सात आरोपींना बेड्या ठोकत 11 मोबाईल हस्तगत केले.

गेल्या काही दिवसांपासून कल्याण शहाड उल्हासनगर आसपासच्या रेल्वे स्थानकांमध्ये मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या.. चोरटे गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचा मोबाईल चोरत होते.. कालचा दिवसभरामध्ये कल्याण रेल्वे स्थानकातून दहा प्रवाशांचे मोबाईल तर शहाड येथून एक मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली होती.. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी प्रमोद देशमुख यांचे एक पथक नेमण्यात आले.. काल दिवसभरातील रेल्वे स्टेशन वरील सीसीटीव्ही तपासात , खबऱ्यांकडून माहिती घेत अवघ्या काही तासात कल्याण रेल्वे पोलिसांनी तब्बल सात आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 11 मोबाईल हस्तगत केलेत.अहमद शेख ,विशाल काकडे,मोहम्मद हसन अन्सारी,सरजील अन्सारी ,सचिन गवळी ,मंगलअली शेख ,संदीप भाटकर अशी या चोरट्यांची नावे आहेत .हे सात ही आरोपी सराईत चोरटे असून त्यांच्या विरोधात या आधी देखील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *