कल्याण-कल्याण पश्चिमेतील फडके मैदान प्रभागातील साई मंदीर ते वाडेघर या 18 मीटर रस्त्याचे डांबरीकरण खर्च कर करता करण्यात आले आहे. या कामासाठी शिवसेना माजी नगरसेवक मोहन उगले यांनी पाठपुरावा केला होता.
महापालिका हद्दीतील विविध टेलिकॉम कंपन्यांकडून टेलिकॉमच्या सेवा वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदले जातात. रस्ते खोदकामासाठी महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. तसेच खोदकामाकरीता खड्डा फी महापालिकेस भरावी लागते. बडय़ा मोबाईल कंपन्यांनी सेवा वाहिन्या टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम केले. त्याचे पुनपृष्र्ठीकरण करण्याचे काम महापालिकेकडून करण्यात येते. कंपन्यांनी भरलेल्या खड्डा फीच्या रक्कमेतून हे काम केले जाते. साई मंदिर ते वाडेघर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी माजी नगरसेवक उगले यांनी पाठपुरावा सुरु केला. त्यासाठी खर्च येणार नाही ही बाबही त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. रस्त्याचे डांबरीकरण कंपन्यांनी भरलेल्या खड्डे फिच्या रक्कमेतून करण्यात आले. त्यासाठी जवळपास 25 लाख रुपयांचा खर्च झाला. मात्र हा खर्च खड्डा फी रक्कमेतून करण्यात आला. त्यामुळे रस्त्याच्या डांबरीकरणकरीता वेगळा असा काही खर्च करावा लागला नाही. रस्त्याचे डांबरीकरण खर्चाविना झाले असल्याचे उगले यांनी सांगितले.