भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा नाशिक शहर येथे संपन्न झाला. दरम्यान त्यामध्ये नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या.
सत्ता ही सामान्य माणसांच्या कल्याणासाठी वापरली पाहिजे, भाजपा व शिंदे गटाचे सरकार आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा विकासकामांची सुरुवात झाली आहे. शेवटच्या माणसापर्यंत निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जबाबदारी देताना आनंद होत आहे, औश्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सातत्याने वडार समाजबांधवांना मदत केली आहे. या पदावर नियुक्त्या करत असतानाही त्यांचे कार्यकर्त्यांवर विशेष लक्ष होते. पदांचा वापर पक्षाच्या संघटनबांधणी व पक्षवाढीसाठी करा सर्व योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहचवा, आगामी काळात भटके विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर काम करण्याचे आवाहन भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी केले.
आज मेळाव्यात भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी रवी शिंदे, भटके विमुक्त आघाडी प्रदेश सचिव पदी राजू जाधव, भटके विमुक्त आघाडी युवा नाशिक शहराध्यक्ष पदी राहुल पवार यांची निवड केली.
यावेळी उत्तर महाराष्ट्र संयोजक नवनाथजी ढगे, महाराष्ट्र उपाध्यक्ष बबन मोहिते, नाशिक शहर अध्यक्ष बापूसाहेब शिंदे, नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष रवींद्र गांगोले, शिवक्रांती वडार फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र शिंदे, भाजपा कामगार आघाडी उपाध्यक्ष महाराष्ट्र राजाभाऊ सौदे, महिला अध्यक्ष नाशिक ग्रामीण विद्याताई गोसावी, युवती अध्यक्ष नाशिक ग्रामीण दिपाली माळी, जिल्हा सचिव नाशिक ग्रामीण रत्नाताई गोसावी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.