कल्याण मधील शिवसेना भाजप मध्ये सुरू असलेल्या कुरघोडीवरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नाव घेता शिवसेनेच्या शहर प्रमुखांना खडेबोल सुनावले आहेत ..टीआरपी कसा वाढेल त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोय ,मात्र आता टी आर पी चा खेळ बंद झालाय.. युतीबाबत सर्व निर्णय वरिष्ठ घेतील…शिवसेनेला सहकार्य न करण्याबाबतच्या ठरावा बाबत निर्णय वरिष्ठ नेते निर्णय घेतील असे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले .मंत्री रवींद्र यांनी आज मोदी @9 या मोहिमेंतर्गत डोंबिवली शेलार नाका परिसरात घरोघरी जावून नागरिकांची भेट घेत सरकारची कामे सांगितली.यावेळी त्यांनी स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या शिवसेना भाजपा नेत्यांमधील कुरघोडीबाबत स्थानिक शिवसेना शहरप्रमुखाना सुनावले .
केंद्रात भाजपाच्या सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जनसंपर्क अभियानांतर्गत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजप जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी डोंबिवली शेलार नाका परिसरात घरोघरी जाऊन नवु वर्षातील सरकारच्या कामांबद्दल जनजागृती केली..याच दरम्यान भाजप आमदार गणपत गायकवाड व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील सुरू असलेले शीत युद्ध तर डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघावर केलेला दावा याबाबत रवींद्र चव्हाण यांना प्रश्न विचारले असतायावेळी कल्याण डोंबिवलित शिवसेना भाजपा मध्ये सुरू असलेल्या कुरघोड्या वरून पत्रकारांशी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी नाव ने घेता टी आर पी चा खेळ बंद करा असा शब्दात शिवसेना शहरप्रमुखाना फटकारले…रवींद्र चव्हाण यांनी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात येत्या 2024 मध्ये एन डी ए चे सर्व उमेदवार जिकुन आणणे..त्यानंतर च्या काळात शिवसेना भाजप युतीचे सर्व उमेदवार जिंकून आणणे ही आमची प्राथमिकता आहे .. सर्व ठिकाणी टीआरपीचा मोठ्या प्रमाणात खेळ सुरू झालाय प्रत्येकाला असं वाटतंय माझा टीआरपी कसा वाढेल मग त्यासाठी प्रत्येक जण हा प्रयत्न करतोय तर कल्याण लोकसभेत शिवसेनेला सहकार्य न करण्याच्या ठरवाबाबत बोलताना या ठरावाबाबत वरिष्ठ नेते त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेणार असल्याचे सांगितले.तर शिवसेनेकडून कल्याण ग्रामीण विधानसभेवर दावा करण्यात आल्याबाबत प्रश्नाला उत्तर देताना मंत्री चव्हाण यांनी शिवसेना भाजप युती मधील सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतल्या जातात ..यामुळे यानंतरच्या बाबतीत टीआरपीचा खेळ संपला असे मी घोषित करतो असे संगीतले