कल्याणमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या मेळावा पार पडला. मात्र या मेळाव्या दरम्यान काग्रेसच्या एका नेत्याने अकलेचे तारे तोडले आहे. राजन भोसले हे कल्याण जिल्हा प्रभारी आणि प्रदेश सचिव आहे. त्यांनी त्यांच्या भाषणा दरम्यान पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी आहे. आजचा दिवस महान आहे अशी सुरुवात केली. मात्र महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांनी त्यांना हटकले. हे ऐकून मंचावर बसलेले नाना पटोले यांच्यासह नेते आणि पदाधिकारी हैराण झाले.
कल्याणमध्ये आज काँग्रेस पक्षाच्या वतीने अत्रे रंगमंदिरात पक्षाचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित होते. या मेळाव्यास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली हेती. सभागृह खच्चून भरले होते. अनेकांना तर बसायला जागा मिळाली नाही. यावेळी कल्याण जिल्हा प्रभारी आणि प्रदेश सचिव राजन भोसले यांनी भाषणाला सुरुवात केली. मित्रांनो आज आपल्याकडे महत्वाचा दिवस आहे. याच दिवशी राजीव गांधी यांची हत्या झाली होती. राजीव गांधी याचा आज स्मृती दिवस असल्याने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. अशा दूरदृष्टी नेत्यामुळेच असे बोलत असताना महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी या त्यांनी त्यांना हटकले. त्या त्यांच्या निदर्शनास आणून दिले की, आज स्मृती दिन नाही. तेव्हा लगेच भोसले यांनी त्यांची चूक सुधारत राजीव गांधी यांचा स्मृती दिन २१ मे रोजी असतो असे सावरुन घेतले.
काँग्रेसच्या प्रदेश सचिवला गांधीचा स्मृती दिन कोणता हे माहिती नसल्याने मंचावरील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते हैराण झाले. प्रदेश सचिव भोसले यांनी त्यांच्य भाषणात अकलेचे तारे तोडल्याने त्यांच्या या भाषण हे चर्चेचा विषय झाले आहे.
पोलीस विभाग हतबल झालाय झाला त्यांच्यावर राजकीय व राज्यकर्त्यांचा दबाव आहे – पोलीस ठाण्यात पीडित महिले ची भेट घेतल्यानंतर नाना पटोले यांचा आरोप
डोंबिवली पूर्व भाजप मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार करणारी पिडीता ही गेल्या 21 दिवसापासून मानपाडा पोलीस ठाण्यात उपोषण करत आहे.. नंदू जोशी यांना अटक करण्याचे मागणी ही महिला करतेय. मात्र अद्याप काहीच कारवाई झालेली नसल्याचा आरोप या पिडीतेने केलाय . काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी आज या पीडितेची भेट घेतली त्यानंतर पोलिसांची भेट घेतली.. यावेळी पत्रकारांशी बोलताना कधी नव्हे इतका दबाव पोलीस विभागावर पाहतोय हा जिल्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आहे भाजप विरुद्ध शिंदे गट या लढाईमध्ये पोलिसांवर दबाव निर्माण झालाय हे भूषणावह नाही …एक महिला आपल्याला न्याय मिळवण्यासाठी 21 दिवस पोलीस स्टेशनला बसते.. गुन्हा दाखल होऊ नये चौकशी केली जात नाही पोलिसांवर नेमका कोणता दबाव आहे हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो..पोलीस विभाग हतबल झालाय झाला त्यांच्यावर राजकीय व राज्यकर्त्यांचा दबाव आहे . त्यामुळे पिढीतला काँग्रेस पक्ष हा कोर्टाच्या माध्यमातून न्याय मिळवून देईल असा आश्वासन यावेळी नाना पाटोले यांनी दिले