कल्याण रेल्वे स्थानकात गर्दूल्ल्यांकडून महिला प्रवाशाची छेड काढण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ मनसेकडून आंदोलन करण्यात आले. कल्याण जीआरपी पोलिसांनी गेल्या सात दिवसापासून गर्दूल्यां्या विरोधात कारवाई सुरु केली आहे. आत्तापर्यंत १०० गर्दूल्ले ताब्यात घेण्यात आले आहे. आत्ता पोलिासंची डोकेदुखी वाढली आहे. कारण इतक्या मोट्या प्रमाणात ताब्यात घेण्यात आलेल्या गर्दूल्यांना कुठे ठेवायचे अशी समस्या पोलिसांपुढे उभी राहिली आहे. एक समस्या दूर करण्याकरीता आत्ता दुसऱ््या समस्येचा सामना करावा लागात आहेत.
कल्याण रेल्वे स्थानकात एका तरुणीला गर्दूल्याने मिठी मारली. कोणतीही तक्रार नसताना कल्याण जीआरपी पोलिस ठाण्याचे वरिष्ट पोलिस निरिक्षक मुकेश ढगे यांनी या प्रकरणात स्वत: दखल घेत गर्दूल्याला बेड्या ठाोकल्या या घटनेनंतर रेल्वे प्रवासी संघटना आणि मनसे आक्रमक झाले. कल्याण मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांनी कल्याण रेल्वे स्थानकात आंदोलन करण्यात आले. स्टेशन परिसर फेरीवाला आणि गर्दूल्ले मुक्त करण्यात यावे यासाठी रेल्वे स्टेशन मास्तरला बांगड्या भेट दिल्या. कल्याण पोलिसांनी कारवाई सुरु केली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार जवळपास १०० पेक्षा जास्त गर्दूल्ले स्टेशन परिसरातून पकडले गेले आहे. त्यांच्या विरोधात प्रतिबंधक कारवाई सुरु आहे. मात्र पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. कारण दहा ते १२ गर्दूल्ले ताब्यात घेतले जात आहे. काही दिवस त्यांना ला’कअपमध्ये ठेवले जाते. यांना जास्त ला’पअपमध्ये ठेवता येत नाही. त्याचे पुनर्वसन झाले पाहिजे. त्यांच्या राहण्याची साेय झाली पाहिजे. ही व्यवस्था पोलिस करु शकत नाही. या गर्दूल्यांकरीता पुनर्वसन केंद्र हवे. पोलिस केवळ कारवाई करु शकतात. पुनर्वसनाची जबाबदारी पोलिसाची नाही. ही समस्या आत्ता पोलिसांची डोकेदुखी ठरली आहे.