मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यात चांगले काम करीत आहेत. त्यांच्या या कामात कल्याण लोकसभेतील पदाधिकाऱ्यांनी मिठाचा खडा टाकण्याचे काम करु नये अशी माझी विनंती आहे असे आवाहन शिवसेना युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी केले आहे. नक्की त्यांनी कोणावर निशाणा साधला आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दीपेश मात्रे यांच्या विधानानंतर भाजपची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखऱ बागडे यांच्या बदलीवरुन भाजप आणि शिवसेना शिंदे गट मध्ये जोरदार शीत युद्ध सुरु आहे. हा वाद इतका विकोपाला गेला आहे की, चक्क भाजप नेत्यांनी कल्याण लोकसभा मतदार संघात शिवसेनेला बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या या बैठकीत शिवसेना नेत्यावर जोरदार टिका करण्यात आली. शिवसेनेचा निषेध करण्यात आला खासदार शिंदे यांच्यावर आरोप करण्यात आले. एवढेच नाही तर त्यांचे स्वीय सहाय्यक अभीजीत दरेकर यांनाही लक्ष्य करण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली. या प्रकरणावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली की, ठराव झाला आहे. कार्यकर्त्यांची समजूतू काढू त्यांची मागणी वरिष्ठांना कळवू
भाजपच्या या बैठकीनंतर गुरुवारी शिवसेनेने सावध पावित्रा घेत युती धर्म पाळणार असे म्हटले हाेते. मात्र शुक्रवारी शिवसेना युवा नेते म्हात्रे यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे की, आत्तापर्यंत शिवसेना भाजपात आलबेल आहे. आम्ही नेहमीच युती धर्माचा पालन केले आहे. कुठेही बॅनर वर आणि कार्यक्रमात किंवा कोणत्याही कामात भाजप नेत्यांचा सन्मान केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून चांगले काम राज्यात सुरु आहे. कल्याण लोकसभेतील पदाधिकाऱ्यांनी चांगल्या कामात मिठाचा खडा टाकण्याचे काम करु नये ही विनंती आहे. राहिला प्रशन पाोलिस अधिकाऱ्याचा तपास सुरु आहे. ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कारवाई होईल. म्हात्रे यांनी हे आवाहन केले आहे की टिका केली आहे. हे भाजपच्या प्रतिक्रियेनंतरच कळणार आहे.