कल्याण ग्रामीण मधील निळजे स्टेशन समोर एका घराला आग लागली आहे. भंगार दुकान आणि घर एकत्र आहे. भंगाराच्या दुकानात आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. एमआयडीसी फायर ब्रिगेडची गाडी घटनास्थळी पोहोचली आहे, परंतु रस्त्यावर एक कार पार्क असल्याने फायर ब्रिगेडची गाडी घटना स्थळ पर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे त्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही प्राथमिक माहिती फायर ब्रिगेड च्या अधिकाऱ्यांनी न्यूज स्क्वेअर लाईव्ह ला दिली आहे