मकर संक्राती निमित्त पतंग उडवण्यासाठी कल्याण गांधारी पूलासह रिंग रोड वर गर्दी
:- मकर संक्राती निमित्त पतंग उडविण्याचा आनंद लुटण्यासाठी आबाल वृद्धानी ,कुटुंबासह कल्याण पश्चिमेकडील गांधारी पूलांसह नव्या रिंगरोडवर गर्दी केली होती. हातातील मांज्याला अलगद ढील देत पतंगाला आकाशात झेपावण्यास मदत करतानाच दुसऱ्याचा पतंग कापण्याची स्पर्धा आसमंतात रंगली होती.तर विविध रंगाचे आणि आकाराचे पतंग वाऱ्याच्या वेगाने आकाशाकडे झेपावतानाच मनमोहक दृश्य टिपण्यासाठी देखील नागरिकांची झुबड उडाली होती.