पर्यावरण दिनानिमित्त धर्मवीर आनंद दिघे नाना नानी पार्कमध्ये वृक्षारोपण

Uncategorized

कल्याण-कल्याण पश्चिमेतील फडके मैदानाजवळ असलेल्या धर्मवीर आनंद दिघे नाना नानी पार्कमध्ये आज 200 झाडे लावण्याचा उपक्रम पार पडला.

शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी हे पार्क विकसीत केली आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आज 200 झाडे लावण्यात आली. माजी शिवसेना नगरसेवक जयवंत भोईर, विद्याधर भोईर आणि विकास काटकर यांच्या हस्ते कडू लिंब, जास्वंद, कडीपत्ता, तुळस आदी रोपे लावण्यात आली. यावेळी शिवसेना पदाधिकारी स्वप्नील मोरे, अनंता पगार , रितेश पाबळे, ललित लांडगे आदी उपस्थीत होते. फडके मैदानानजीक जागा पडीक होती. त्याठीकाणी कचरा गाडय़ा उभ्या केल्या जात होत्या. या परिसरातील नागरीकांना त्याची दुर्गधी सहन करावी लागत होती. या गाडय़ा हटवून त्याठिकाणी आनंद दिघे नाना नानी पार्क विकसित करण्यात आले. जॉगिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरीकांसाठी बसण्याकरीता बाके, मुलांसाठी झोपाळा, सी सॉ, तरुण तरुणीकरीता ओपन जीम, हिरवळ सगळे काही तयार केले आहे. या पार्कचा आनंद लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत घेतला जात आहे. त्याठीकाणी आज 200 झाडे लावल्याने हिरवाई बहणार असल्याचा दावा उगले यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *