कल्याण
भर रस्त्यात एका महिलेचा पाठलाग करत तिची चैन हिसकावून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला महात्मा पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पकडलं . पुरुषोत्तम चकोरिया असे या चोरट्याचं नाव असून त्याने याआधी देखील चोऱ्या केल्यात का याचा तपास पोलीस करत आहेत
:
- काल रात्रीच्या सुमारास रामबाग परिसरातून एक महिला पायी चालत जात होती. एक इसम महिलेचा पाठलाग करत होता. संधी मिळताच या इसमाने महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावुन पळून जाण्याचा प्रयत्न केला .महिलेने आरडाओरड केला . आजूबाजूच्या नागरिकांनी या चोरट्याचा पाठलाग करत गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या मदतीने त्याला पकडलं .कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी या चोरट्याला ताब्यात घेतलं . पुरुषोत्तम चकोरिया असे या चोरट्याचं नाव आहे पुरुषोत्तम याने या आधी चोऱ्या केल्यात का याचा तपास आता महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी किरण पुढील तपास करीत आहेत सुरू आहे