मंत्रीमंडळात एखादे मंत्री पद आम्हाला मिळणार अशी आशा केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. मनसेला मंत्रीमंडळात घेण्याचा काही संबंधच येत नाही. ते काही निवडणूकीत आमच्या सोबत नव्हते. त्यांना मंत्रीपद देण्याचा विचार होत असेल तर आमचा विरोध असेल असे ही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. इतकेच नाही टू थर्ड पेक्षा जास्त आमदार ज्यांच्या बाजूने आहेत. तिच खरी शिवसेना असे विधान आठवले यांनी केले आहे.कल्याणचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दयाल बहादूरे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त ते अत्रे रंगमंदिरात आले होते.
1 रामदास आठवले यांची मनसेवर प्रतिक्रिया
मनसेला मंत्रीमंडळात घेण्याचा काही संबंधच येत नाही. ते काही निवडणूकीत आमच्या सोबत नव्हते. त्यांना मंत्रीपद देण्याचा विचार होत असेल तर आमचा विरोध असेल असे ही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
2 टू थर्डपेक्षा जास्त आमदार.
ज्यांच्याकडे आहेत. तीच खरी शिवसेना
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला. कंटाळून आणि संजय राऊत यांच्या अनेक वक्तव्यांचा खरपूस समाचार घेण्यासाठी हे सगळे आमदार वेगळे झाले. त्यांनी वेगळा गट स्थापन केला. टू थर्ड पेक्षा जास्त आमदार आहेत. तिच खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, दोघांकडे 164 लोक आहे. पुढच्या वेळी आम्ही प्रत्येकी 100 लोक निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला आहे ही बाब आठवले यांनी सांगितली.
3, मंत्री मंडळाच्या विस्तारात आरपीआयला एखादे मंत्रीपद मिळणार
सध्या अधिवेशनापूरते मंत्री मंडळ हे कमी मंत्र्याचे होणार आहे. मात्र जेव्हा मंत्री मंडळाचा विस्तार होईल तेव्हा एखादे मंत्री पद आरपीआय नक्कीच मिळेल. एखादे एमएलसी, महामंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष पद आरपीआयला मिळावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आरपीआयचा नव्या सरकारला पाठींबा आहे.
4, एकनाथ शिंदे यांच्या व्हायरल व्हीडीओवर
रामदास आठवले यांची प्रतिक्रिया
कुठल्या तरी एखाद्या कामासाठी मुख्यमंत्री बोलले असतील तर तो जो व्हीडीओ गैर अजिबात नाही. एखाद्या अधिका:याला काम करणो असे सांगणो हे मुख्यमंत्र्यांचा अधिकारच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एखाद्या अधिका:यास सांगितले असेल तर त्यात गैर काही नाही असे रामदास आठवले यांनी सांगितले.