भाजप शिवसेना वादावर पडदा पडला ..?
कल्यांन
।- खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा आणि त्यांना मतदान करून पुन्हा एकदा बलाढ्य मताने निवडून आणा नवीन संसदेत पाठवा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली जवळील भोपरगावात आयोजित एका विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी केलं . रवींद्र चव्हाण यांच्या या आवाहनामुळे डोंबिवली मधील भाजप शिवसेनेतील वादावर आता पडदा पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे
:-कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप शिवसेना शिंदे गटात धुसफूस सुरू होती .दोन्ही बाजूचे कार्यकर्ते पदाधिकरी एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप करत होते .त्यानंतर भाजप व खासदार श्रीकांत शिंदे मध्ये खटके उडाले होते .खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अप्रत्यक्ष रित्या नाराजी व्यक्त केली तर कल्याण पूर्व मतदार संघात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली होती .भाजप वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थी नंतरही भाजप आणि शिंदे गटात धुसफूस सूरु असल्याचे पाहायला मिळत होते .मात्र ही धुसफूस आता थांबल्याचे पाहायल मिळतंय .काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेत चक्की नाका परिसरातील कार्यक्रमात आमदार गणपत गायकवाड खासदार श्रीकांत शिंदे एकत्र होते तर डोंबिवलित खासदार श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या दिपउत्सवात खासदार शिंदे यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मध्ये रवींद्र चव्हाण देखील उपस्थित होते . त्यानंतर कल्याण ग्रामीण मधील भोपर येथे आयोजित विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचं कौतुक केलं यावेळी बोलताना त्यांनी या भागातील लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा आणि त्यांना मतदान करून बलाढ्य मताने निवडून आना, आपण पुन्हा एकदा नवीन संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी कटिबद्ध राहिल पाहिजे ,कल्याण ग्रामीण मधील पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत असे सांगितले . रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्या नंतर कल्याण लोकसभेमधील भाजप व शिवसेना शिंदे गटातील धुसफूस संपल्याचं दिसून येतंय भाजपा पदाधिकारी संदीप माळी यांच्या प्रयत्नाने कल्याण ग्रामीण मधील भोकर परिसरात कोट्यवधी निधीच्या माध्यमातून विकास काम होणार आहे