कल्याण
.-धावत्या मेल एक्सप्रेसमध्ये एका दीड वर्षाच्या चिमुकलीला चोरण्याचा प्रयत्न करणाऱ््या चोरट्याला प्रवाशांनी पकडून कल्याण जीआरपी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सलीम पठाण असे या चोरट्याचे नाव असून तो नाशिक येथे राहणारा आहे. मुलीची आई झोपली होती. वडील लघूशंकेसाठी गेले असता सलीम पठाण याने संधी साधत मुलीला चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र काही सर्तक प्रवाशांची नजर सलीम पठाण यांच्याकडे गेल्याने त्याचा मुलीला चोरण्याचा डाव फसला. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करीत कल्याम जीआरपी पोलिसानी पुढील तपास सुरु केला आहे. पोलिसांनी सृष्टी गुप्ता या दीड वर्षाच्या चिमुकलीला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले आहे.
वसई येथील नालासोपारा परिसरात राहणारे राकेश गुप्ता हे त्यांची पत्नी आणि दीड वर्षाची मुलगी सृष्टीला घेऊन साईनगर शिर्डी एक्सप्रेसने प्रवास करीत होते. आज शुक्रवारी पहाटे एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने येत असताना असताना तिची आई झोपली होती. वडिल लघूशंकेसाठी गेले होते. त्याच दरम्यान सृष्टीला एका व्यक्तीने स्वत: जवळ घेतले. तो तिला घेऊन जात असताना काही सर्तक प्रवाशांची नजर त्याच्यावर पडली. काही प्रवाशांनी त्याला या बाबत हटकत विचारपूस केली. तो व्यक्ती काही उत्तर देत नव्हता. त्याच दरम्यान झोपलेली मुलीची आई जागी झाली. तिने सांगितले की, ही माझी मुलगी आहे. लगेचच प्रवाशानी त्या व्यक्तिला पकडले. गाडी कल्याण स्थानकात येताच त्याला कल्याण जीआरपी पोलीसांच्या ताब्यात दिले. सलीम पठाण असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडे तिकीट नव्हते. सध्या सलीम पठाणच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक मुकेश ढगे पोलिस अधिकारी प्रमोद देशमुख पोलिस अधिकारी अनिल जवले, तपास अधिकारी खेतमाली, पोलिस कर्मचारी अभिजीत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु आहे. सलीम पठाण हा नाशिक येथील येवल्याचा राहणारा आहे. त्याने अशा प्रकारे किती गुन्हे केले आहेत. याचा तपास करणे गरजेचे आहे. त्याला रेल्वे न्यायालयात हजर केले जाणार आहे.