मेल एक्सप्रेसच्या तिकिटासाठी रांगेत उभे असलेल्या प्रवाशाला दलालांकडून मारहाण
कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तपास सुरू
कल्याण : मेल एक्सप्रेसचे तिकीट घेण्यासाठी दिवसभर रांगेत उभे असलेल्या एका प्रवाशाला तिकीट दलालांनी काल रात्रीच्या सुमारास मारहाण केल्याची घटना कल्याण रेल्वे स्टेशन परिसरतील तिकीट आरक्षण केंद्रावर घडली . याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.. मात्र या घटनेमुळे तिकीट दलालांची दादागिरी समोर आली आहे .कोकण रेल्वेसाठी तिकीट आरक्षणात दलालांचे मक्तेदारी असल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी करत या दलालाना धडा शिकवण्याचा इशारा देखील राजू पाटील यांनी दिलाय.या पार्शवभूमीवर अशा दलालांवर कठोर कारवाईची मागणी आता केली जातेय ..
सुट्ट्यांमध्ये कल्याण हून परराज्यात जाण्यासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात कल्याण रेल्वे स्थानकावर वर्दळ असते. सामान्य प्रवाशाला तिकिटासाठी वणवण करावी लागते अनेकदा तर पूर्ण दिवस तिकीट आरक्षण केंद्रावर रांगेत उभे राहावे लागते तरीही तिकीट मिळत नाही .अनधिकृत दलालांकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण केले जाते. तत्काळ तिकीट मिळवण्यासाठी दलालांकडून तिकीट खिडक्यांसमोर एकापेक्षा जास्त दलाल उभे केले जातात. त्यामुळे प्रवाशांना तिकीट मिळत नाही. प्रवाशांनी यावेळी दलालाविरोधात आवाज उठवल्यास या दलालांकडून दादागिरी व मारहाण करण्यात आल्याच्या अनेक घटना या आधी देखील कल्याण रेल्वे स्टेशन आरक्षण केंद्रात घडल्या आहेत.. असाच एक प्रकार काल घडला. कल्याणहून बनारस ला जाण्यासाठी संतोष राय हा तरुण तीन दिवसापासून कल्याण आरक्षण केंद्रात रांगेवर उभा आहे. एका दिवशी त्याच्या 50 नंबर होता तिकीट मिळाले नाही. दुसरा दिवशी त्याचा अकरा नंबर होता टिकत मिळाले नाही परंतु तिकीट मिळणार या आशाने संतोष रांगेत उभा आहे आणि रात्री दलाल आले त्यांनी स्वतःचे नंबर लावायला सुरुवात केली. संतोष राय यांनी विरोध केला आणि व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला मात्र दलालांकडून संतोष याला मारहाण करण्यात आली. त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून मोबाईल मधील व्हिडिओ डिलीट करण्यात आले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद आहे. या प्रकरणाची कल्याण जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी गंभीर दखल घेतली पाहिजे .दरम्यान या घटनेमुळे तिकीट दलालांची दादागिरी समोर आली असून कल्याण रेल्वे पोलिसांनी सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता केली जातेय या प्रकरणात कल्याण जीआरपी चे वरिष्ठ पुजणी निरीक्षक मुकेश ढगे यांनी सांगितले की तक्रार आमच्याकडे आली आहे तपास सुरू आहे कल्याण आर पी एफ सी इन्चार्ज राकेश कुमार शर्मा यांनी सांगितले की ही घटना सोमवारी जाती घडली कल्याण आरक्षण केंद्र हा दलात मुक्त झाला आहे आमच्या परीने दलारांवर योग्य ती कारवाई केली जाईल मात्र कॅमेरेवर बोलण्यास दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी नकार दिल्या