कल्याण ग्रामीण मधील एम आय डी सी परिसरात नालेसफाईची पाहणी युवासेनेची सचिव दिपेश म्हात्रे यांनी आज केली.दोन दिवसानंतर पुन्हा नालेसफाईच्या कामाची पाहणी केली जाईल.या परिसरातील नालेसफाईमध्ये निष्काळजी पणा केला तर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा शिवसेना युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी दिला आहे.
पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या कामाला कल्याण डाेंबिवली महापालिका हद्दीत सुरुवात करण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसात हे काम पूर्ण केले जाणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. पावासाळ्यात कल्याण ग्रामीण भागातील एम आय डी सी निवासी भागात नाले तुंबल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरते .रस्त्यावर पाणी सचल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना युवा सेना प्रदेश सचिव व माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनि एमआयडीसी परिसरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. यावेळी महापालिकेचे अधिकारी, स्थानिक पूजा मात्र योगेश मात्रे आधी पदाधिकारी देखील उपस्थित होते..यावेळी दीपेश म्हात्रे यांनी एमआयडीसी परिसरातील नाल्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. नालेसफाईची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत.पुन्हा दोन दिवसात पूर्ण नालेसफाईच्या कामाची पाहणी करणार आहे.या परिसरातील नालेसफाईमध्ये निष्काळजी पणा केला तर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिपेश म्हात्रे यांनी दिला आहे.
24 एप्रिल रोजी मनसे आमदार राजू पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह एमआयडीसी परिसरात नालेसफाईच्या पाणी दौरा केला होता..दोन दिवसाआधी एमआयडीसी क्षेत्रात नालेसफाईचे कामांना सुरुवात झालीआहे असा दावा मनसेचे स्थानिक पदाधिकारी संजय चव्हाण यांनी केला